शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

टी.वाय.बी.कॉमचा निकाल जाहीर, पण निकाल संकेतस्थळावर न आल्याने विद्यार्थी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 12:05 IST

मुंबई विद्यापीठ गेल्या २ महिन्यापासून सातत्याने निकला न लागल्यामुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठ गेल्या २ महिन्यापासून सातत्याने निकला न लागल्यामुळे चर्चेत आहे.अखेर विद्यापीठाने TY.Bcom च्या ५ व्या आणि 6 व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर केले.इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झाल्याने अजूनही निकला संकेतस्थळावर दिसत नाहीत. 

मुंबई, दि. 28- मुंबई विद्यापीठ गेल्या २ महिन्यापासून सातत्याने निकाल न लागल्यामुळे चर्चेत आहे. त्यानंतर अखेर विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉम च्या ५ व्या आणि 6 व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर केले. पण विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झाल्याने अजूनही निकाल संकेतस्थळावर दिसत नाहीत. 

रविवारी रात्री उशीरा निकाल जाहीर झाल्याचं कळल्यावर विद्यार्थ्यांनी निकाल बघायला सुरुवात केली. पण निकाल दिसत नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. एकाच वेळी जास्त विद्यार्थी संख्या असल्याने निकाल पाहण्यास अडचणी येत असल्याचं विद्यार्थ्यांना वाटलं. पण विद्यापीठाकडूनच निकाल अपलोड होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे निकाल कधी पाहायला मिळेल याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठाचा गोंधळ अजूनही सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.

रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. पाचव्या सत्राचा निकाल हा ६०.९२ टक्के लागला असून सहाव्या सत्राचा निकाल ६५.५६ टक्के इतका लागला आहे. आतापर्यंत ४३२ अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत विद्यापीठाला अजून ४५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.

वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर तपासण्यासाठी आता विद्यापीठ अन्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य शाखेचे निकालच रखडले. सध्या विद्यापीठाला ४१ हजार १०५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर आयडॉलच्या ५८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. गणेशोत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी ८३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी ४ हजार ३४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. यात आयडॉलच्या वाणिज्यच्या २,६८४ तर, वाणिज्य नियमित अभ्यासक्रमाच्या १,६२१ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ