हसरूल तलावात दोन तरुण बुडाले
By Admin | Updated: August 17, 2014 01:46 IST2014-08-17T01:46:40+5:302014-08-17T01:46:40+5:30
हसरूल तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले, तर एकाने वेळीच स्वत:ला सावरल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

हसरूल तलावात दोन तरुण बुडाले
>औरंगाबाद : हसरूल तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले, तर एकाने वेळीच स्वत:ला सावरल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. रोहित राजाभाऊ शिंदे (24) आणि डॅनी (रा. मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.
जाधववाडी येथील रहिवासी रोहित आणि सारा वैभव येथील निवासी कृष्णा देवलाल निंभोरे (24) हे दोघे काही दिवसांपूर्वी एका कॉल सेंटरमध्ये काम करीत असत. तिथेच त्यांची मैत्री झाली. रोहितचा मुंबईतील मित्र डॅनी त्याला भेटण्यासाठी औरंगाबादेत आला होता. हे तिघेही शनिवारी पोहण्यासाठी हसरूल तलावात उतरले.
तलावाच्या मध्यार्पयत गेलेले रोहित आणि डॅनी बुडायला लागलेले काठाजवळ पोहत असलेल्या कृष्णाने पाहिले. त्यांना वाचविण्यासाठी तो तिकडे धावला; मात्र तोर्पयत ते बुडाले होते. त्याच्या आवाजाने लोक जमा झाले. अगिAशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. डॅनीचे पूर्ण नाव कृष्णाला माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)