दोन वर्षांचा मुलगा प्यायला रॉकेल

By Admin | Updated: May 18, 2016 04:55 IST2016-05-18T04:55:26+5:302016-05-18T04:55:26+5:30

घरात खेळत असताना पाणी समजून दोन वर्षांचा चिमुरडा रॉकेल प्यायल्याची घटना भांडुपमध्ये घडली

Two-year-old son drinks kerala | दोन वर्षांचा मुलगा प्यायला रॉकेल

दोन वर्षांचा मुलगा प्यायला रॉकेल


मुंबई : घरात खेळत असताना पाणी समजून दोन वर्षांचा चिमुरडा रॉकेल प्यायल्याची घटना भांडुपमध्ये घडली. अनिस शेख असे मुलाचे नाव असून, त्याला मुलुंड अग्रवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
शेख कुटुंबीय भांडुप सोनापूर परिसरात राहतात. सोमवारी रात्री १च्या सुमारास आई घरकामात व्यग्र असताना खेळता-खेळता
तहान लागली म्हणून अनिस
बाटलीत असलेले रॉकेल पाणी असल्याचे समजून प्यायला.
अचानक त्याला उलट्या होऊ लागल्या, तेव्हा त्याने रॉकेल प्यायल्याचे तिच्या लक्षात आले. शेख कुटुंबीयांनी अनिसला तत्काळ जवळच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस तेथे पोहोचले. भांडुप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two-year-old son drinks kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.