शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

शिक्षिकेच्या व्हॉटस् अ‍ॅपवर ब्ल्यू फिल्म सेंड करणा-या दोन कामगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 9:19 AM

शिक्षिकेच्या मोबाइलच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि ब्ल्यू फिल्म पाठविणा-या दोन कामगारांना छावणी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देतक्रारदार शिक्षिकेच्या मोबाइलवर दोन वर्षांपासून ते अश्लील टेक्स मेसेज पाठवीत. या मेसेजकडे पीडितेने सुरुवातीला दुर्लक्ष केले.

औरंगाबाद, दि. 4 -  शिक्षिकेच्या मोबाइलच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि ब्ल्यू फिल्म पाठविणा-या दोन कामगारांना छावणी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. यातील एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमळा येथून, तर दुस-याला बजाजनगरातून ताब्यात घेण्यात आले.

गोपाल दयाराम भारती (वय २०, ह.मु. येरमळा) आणि कलीम सलीम इद्रीस (वय २०, ह.मु. बजाजनगर, वाळूज परिसर, दोघे मूळ रा. गढवा, ता. इटावा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी एकाच मालकाच्या दोन वेगवेगळ्या कंपनीमधील कामगार आहेत. तक्रारदार शिक्षिकेच्या मोबाइलवर दोन वर्षांपासून ते अश्लील टेक्स मेसेज पाठवीत. या मेसेजकडे पीडितेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, मेसेज येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी त्या मोबाइलधारकास फोन करून तुम्ही असे घाणेरडे मेसेज पाठवू नका, अशी विनंती केली; 

परंतु आरोपींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या व्हॉटस् अ‍ॅप या सोशल मीडियावर अश्लील चित्रे आणि ब्ल्यू फिल्म पाठविण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या पतीला दिली. आरोपीचे हे कृत्य थांबविण्यासाठी त्यांनी आरोपीच्या मोबाइलवर फोन करून त्यांना खडसावले. त्यानंतर काही दिवस शांत राहिल्यानंतर आरोपींनी पुन्हा पीडितेस घाणेरडे मेसेज पाठविणे सुरूच ठेवले आणि दम असेल तर पकडून दाखवा, असे चॅलेंजच आरोपींनी दिले होते.

मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतरही त्रास सुरूचआरोपी गोपालचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर आरोपीने त्याचा मित्र कलीम यास त्या नंबरवर मेसेज पाठविण्यास सांगितले. कलीम हादेखील बिनधास्तपणे अश्लील चित्रफीत टाकू लागला. रोजच्या या घाणेरड्या प्रकारामुळे शेवटी पीडिता आणि तिच्या पतीने छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. एस.आर. जोशी यांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेतला आणि रात्री त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.