शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीने घेतल्या दोन विकेट

By admin | Updated: October 8, 2014 00:50 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने आज अवघ्या पावणेदोन तासाच्या अंतरात दोन लाचखोरांच्या विकेट घेतल्या. पहिल्यांदा विक्रीपत्र करून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या

निबंधक कार्यालयातील रायटर जेरबंद : पोलीस शिपायालाही फटाकेनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने आज अवघ्या पावणेदोन तासाच्या अंतरात दोन लाचखोरांच्या विकेट घेतल्या. पहिल्यांदा विक्रीपत्र करून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या निबंधक कार्यालयातील ‘रायटर‘च्या मुसक्या बांधल्या. तर, काही वेळेनंतर फटाक्याच्या दुकानाला तात्पुरती परवानगी देण्यासाठी २ हजारांची लाच मागणाऱ्या सक्करदरा ठाण्यातील पोलीस शिपायालाही एसीबीने फटाके लावले.मौजा भांडेवाडी (पारडी) येथील तीन वेगवेगळ्या भूखंडांची विक्री करून घेण्यासाठी तक्रारकर्ता महालमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. येथे लिखाणकाम करणारा (रायटर) शेख अयूब ईस्माईल याने रजिस्ट्रीसाठी तयार करण्यात येणारी कागदपत्रे, लिखाणाची मजुरी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एकूण १ लाख, ९७ हजार, ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्या व्यक्तीने तडजोड केल्यानंतर १ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरवले. त्यापैकी १ लाख, ६० हजार तातडीने शेख अयुबच्या हातात घातले. उर्वरित २० हजार रुपये (साहेबांना देण्यासाठी) आज देण्याचे ठरले होते. मात्र, ही रक्कम द्यायची नसल्यामुळे तक्रारकर्ते थेट एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे पोहचले. जाधव यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतली. त्यानंतर आज सायंकाळी कारवाईसाठी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या चमूने तक्रारकर्त्यांसह सह दुय्यम निबंधक क्ऱ ३ चे महालमधील कार्यालय गाठले. पैसे घेऊन आलो, असे तक्रारकर्त्याने अयुबला सांगितले. अयुबने, ‘लाचेची रक्कम साहेबांसाठी आहे, ती ज्ञानदेव केशवराव भगत यांच्याकडे द्या’, असे सांगितले. भगतने सायंकाळी ६ च्या सुमारास लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीच्या पथकाने अयुब आणि भगतच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)हे साहेब कोण आहेत?निबंधक कार्यालयातील साहेबांना रक्कम द्यावी लागते, असे सांगून दलाल विक्री करणाऱ्याकडून आणि करून घेणाऱ्यांकडून रोज हजारो रुपये सर्रास उकळतात. हे साहेब कोण आहेत, त्याची कधीच कुणी चौकशी करीत नाही. लिखाणाचे अथवा दलालाचे काम करणाऱ्यांच्या हातात हजारो रुपये ठेवले जातात. आज मात्र एसीबीने अयूब आणि भगतच्या मुसक्या बांधल्या. आता ज्यांच्यासाठी २० हजारांची लाच मागण्यात आली, ‘ते साहेब कोण आहेत‘ त्याचीही आम्ही चौकशी करीत असल्याचे एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.