नगर जिल्ह्यात दोन गावे पाण्याखाली

By Admin | Updated: October 2, 2016 15:30 IST2016-10-02T15:30:56+5:302016-10-02T15:30:56+5:30

जामखेड तालुक्यातील दिघोळ व जातेगाव येथील मांजरा नदीला मोठा पूर आला असून, दोन्ही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे आज सकाळपासूनच दोन्ही गावे पाण्याखाली गेली आहेत़

Two villages in the district are under water | नगर जिल्ह्यात दोन गावे पाण्याखाली

नगर जिल्ह्यात दोन गावे पाण्याखाली

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २ : जामखेड तालुक्यातील दिघोळ व जातेगाव येथील मांजरा नदीला मोठा पूर आला असून, दोन्ही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे आज सकाळपासूनच दोन्ही गावे पाण्याखाली गेली आहेत़
जामखेड तालुक्यात रविवारी पहाटेपासून जारेदार पाऊस सुरु आहे़ दिघोळ व जातेगाव या गावांजवळून वाहणाऱ्या मांजरा नदीला यंदा प्रथमच मोठा पूर आला आहे़ नदीपासून अर्धा किलोमीटर दूर असलेल्या जातेगावात पुराचे पाणी शिरले़ महाराष्ट्र बँकेच्या येथील शाखेत दोन फूटांहून अधिक पाणी साचले तर सुमारे पन्नासहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ दिघोळ गावालाही मांजरा नदीच्या पाण्याने वेढले असून, प्रथमच गावात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे़

Web Title: Two villages in the district are under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.