पुण्यातून दोन टन गोमांस जप्त

By Admin | Updated: April 17, 2017 02:36 IST2017-04-17T02:36:42+5:302017-04-17T02:36:42+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला आणि त्यातून २ टन गोमांस जप्त करण्यात आले

Two tonnes of beef seized in Pune | पुण्यातून दोन टन गोमांस जप्त

पुण्यातून दोन टन गोमांस जप्त

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला आणि त्यातून
२ टन गोमांस जप्त करण्यात आले. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने हा प्रकार उघडकीस आणला.
ट्रकचालक कलीम अब्दुल कादर पालकर (४२, रा. लोहियानगर, गंजपेठ), क्लीनर हाजी हारून शेख (३०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. रविवार सकाळी सहापासून गोरक्षकांनी चंदननगर येथे खराडी बायपासवर सापळा रचला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Two tonnes of beef seized in Pune