विजयकुमार सैतवाल, जळगावशौचालयांअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलतर्फे (जेसीआय) ‘प्रोजेक्ट समाधान’ अंतर्गत देशभरात २ हजार शौचालये उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्यापैकी ७ शौचालये खान्देशात उभारली आहेत. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठा येथे महिलांसाठी शौचालय नसल्याने त्यांची गैरसोय होते. महिलांना अडचण होऊ नये म्हणून जेसीआय राष्ट्रीय अध्यक्ष जी. बालसुब्रमण्यम यांनी संस्थेतर्फे शौचालय उभारण्याचा संकल्प केला. त्याला ‘प्रोजेक्ट समाधान’ असे नाव देण्यात आले. देशातील वेगवेगळ्या झोनला उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र अर्थात झोन १३ला ५० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आलेय.
महिलांसाठी दोन हजार शौचालये
By admin | Updated: June 7, 2015 02:06 IST