शेततळ्यात पडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: June 26, 2016 20:35 IST2016-06-26T20:35:07+5:302016-06-26T20:35:07+5:30
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे शेतीतळ्यात पडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.रविवारी (दि.२६)दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

शेततळ्यात पडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २६ - कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे शेतीतळ्यात पडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.रविवारी (दि.२६)दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत मार्गावरील हिवरवाडी येथे राहत असलेली मुले शालेला सुट्टी असल्याने पोहण्याच्या निमित्ताने शेततळ्यात गेली.शेततळ्यात सहा ते सात फूट खोल पाणी होते मात्र दोघांनाही पोहता येत नव्हते.पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
काही वेळानंतर शेतात काम करणाऱ्या कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला.त्यांना तात्काळ बाहेर काढून कुळधरण तसेच कर्जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गौरव बापु गुंड (वय ६ ) व सच्चुत गुलाब गुंड (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. गौरव गुंड हा जिल्हा परिषदेच्या गुंड वस्ती शाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होता.तर सच्चुत गुलाब गुंड हा विद्यार्थी कुळधरणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकत होता.दोघांनाही एक भाऊ आहे. दोन्ही गुंड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.