सात हजाराची लाच घेताना दोन पोलिसांना अटक
By Admin | Updated: May 24, 2017 21:57 IST2017-05-24T21:57:12+5:302017-05-24T21:57:12+5:30
पंचनाम्याच्या कागदपत्रासांठी सात हजार रूपयांची लाच घेताना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी

सात हजाराची लाच घेताना दोन पोलिसांना अटक
>ऑनलाइक लोकमत
जळगाव, दि. 24 - पंचनाम्याच्या कागदपत्रासांठी सात हजार रूपयांची लाच घेताना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता ही कारवाई करण्यात आली.
लोंजे (ता. चाळीसगाव) येथे काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. यात एक जण ठार झाला होता. याबाबत पंचनाम्याच्या कागदपत्राची मागणी त्याच्या नातेवाईकांकडून केली जात होती. यासाठी लोंजे बीटचे हेकॉ. जगदीश चौधरी व पोलीस नाईक अनंत चौधरी यांनी ८ हजार रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी ७ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने ही बाब जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. यावरुन विभागाचे अधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचला. २४ रोजी रात्री साडेसात वाजता शहर पोलीस स्टेशनसमोर तक्रारदाराने ७ हजार रुपये या दोघांना दिले. त्याचवेळी पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.