गोवा राष्ट्रीय महामार्गावर बसची कारला धडक होऊन अपघात, दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 15:18 IST2017-08-24T14:38:30+5:302017-08-24T15:18:42+5:30
गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे

गोवा राष्ट्रीय महामार्गावर बसची कारला धडक होऊन अपघात, दोन जण जखमी
- जयंत धुळप
महाड, दि. 24- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. महाड तालुक्यांतील ईसाने-कांबळे गावाच्या हद्दीत गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास कोकणात जाणाऱ्या प्रवासी खाजगी बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अपघातग्रस्त दोन्ही वाहनं तात्काळ बाजूला काढून गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतून सुरळीत सुरु ठेवण्यात आली आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितलं.