शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात आढळल्या विंचवाच्या दोन नवीन प्रजाती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:33 IST

Jalgaon : ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे.

- अजय पाटील

जळगाव :  जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा शोध आतापर्यंत लागला असून, आता नव्याने सातपुड्यात बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील विंचवाच्या नवीन प्रजातींची नोंद झाली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे. यामुळे सातपुड्याचे महत्व पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाले आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे हे जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावाचे आहेत. तर सत्पाल गंगलमाले हे मुळ सोलापुरचे असून, अक्षय खांडेकर हे सांगली येथील असून, तिन्ही संशोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमार्फत दुर्मीळ प्रजातींचा शोध घेवून, त्या प्रजातींच्या संरक्षणासाठी काम करतात.

सातपुडा पर्वतावरून देण्यात आले विंचवांना नवीन नावनवीन प्रजातीं ही बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रालगत असलेल्या वाघझिरा व खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण ‘कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे करण्यात आल्याची माहिती विवेक वाघे यांनी दिली. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या ५० प्रजाती आढळून आल्या आहेत. या प्रजातीची भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीलीच नोंद आहे.

काय आहेत वैशिष्टये?१) या प्रजातीच्या विंचवाचा रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते.२) नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते. अमेरिकेतील युस्कोर्पिअस संशोधन पत्रिकेत झाली नोंदऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले. त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ज्ञांकडून पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘युस्कोर्पिअस’ या संशोधन पत्रिकेतून २४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे,  सत्पाल गंगलमाले, अक्षय खांडेकर या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचु आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते अशी प्रतिक्रिया या तिन्ही संशोधकांनी ‘लोकमत’ ला दिली.

टॅग्स :JalgaonजळगावJara hatkeजरा हटके