नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकलं नाल्यात ; महिला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 10:13 IST2017-08-18T10:11:47+5:302017-08-18T10:13:00+5:30

नांदेडमध्ये दोन महिन्याच्या चिमुकल्या मुलीला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Two-month-old daughter throws in Nanded; Female absconding | नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकलं नाल्यात ; महिला फरार

नांदेडमध्ये दोन महिन्याच्या मुलीला फेकलं नाल्यात ; महिला फरार

ठळक मुद्देनांदेडमध्ये दोन महिन्याच्या चिमुकल्या मुलीला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. नादेंडमधील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात ही घडली आहे.

नांदेड, दि. 18- पुण्यामध्ये आईनेच स्वतःच्या मुलीला नदीत फेकून दिल्याची घटना ताजी असताना तसाच एक प्रकार पुन्हा घडला आहे. नांदेडमध्ये दोन महिन्याच्या चिमुकल्या मुलीला नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नादेंडमधील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात ही घडली आहे. मुलीला एका महिलेनं नाल्यात फेकल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.

आणखी वाचा

व्यसनाधीन मुलाचा घेतला आईने जीव : २४ तासांत तीन हत्या

आईनेच नवजात मुलीला नदीत फेकले

मुलीला नाल्यात फेकल्यानंतर अज्ञात महिलेनं तिथून तात्काळ पळ काढला. काही लोकांनी वेळीच मुलीला पाहिल्यानं तिला नाल्यातून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या मुलीची प्रकृती चांगली असून संबंधित महिलेचा सध्या शोध सुरु आहे. पण हा प्रकार नेमका कुणी आणि कशासाठी केला याचा सध्या पोलिसांकडून तपास केला जातो आहे.

बुधवारी पुण्यामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. एका आईन पोटच्या मुलीला नदीत फेकून दिलं होतं. आणि त्यानंतर मुलीच्या अपहरणाचा कांगावा केला होता. मात्र, पोलीस चौकशीत आपणच मुलीला फेकल्याचं रेश्मा शेखनं कबूल केलं होतं.

Web Title: Two-month-old daughter throws in Nanded; Female absconding