गुहागरमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात २ ठार

By Admin | Updated: March 2, 2016 11:22 IST2016-03-02T11:21:50+5:302016-03-02T11:22:39+5:30

गुहागर येथे एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाने सहका-याशी झालेल्या बाचाबाचीनंतर केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला

Two killed in security guards firing at Guhagar | गुहागरमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात २ ठार

गुहागरमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात २ ठार

>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २ - रत्नागिरीच्या गुहागर येथे एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाने सहका-याशी झालेल्या बाचाबाचीनंतर केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुहागरच्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये सीआयएसएफच्या जवानांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्याचे रुपांतर बाचाबाचीत झाले. त्यानंतर हरिशकुमार गौड या सुरक्षारक्षकाने आपलाच सहकारी, बी.जी.शिंदे यांच्यावर गोळीबार केला, त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर गौडने दुस-या इसमावरही गोळी झाडली, त्याचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेनंत गौड याने पत्नीसह  स्वत:वरही गोळी झाडली, त्या दोघांवरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Two killed in security guards firing at Guhagar