ट्रेलर एसटीच्या धडकेत २ ठार, ५ गंभीर

By Admin | Updated: May 14, 2014 01:46 IST2014-05-13T20:34:44+5:302014-05-14T01:46:52+5:30

अलिबाग - पेण राज्यमार्गावर शहाबाज पेट्रोलपंपजवळ अलिबागकडून पनवेलला जाणार्‍या एसटी बसने समोरुन येणार्‍या ट्रेलरला दुपारी जोरदार धडक दिली.

Two killed, 5 seriously injured in Trailer ST | ट्रेलर एसटीच्या धडकेत २ ठार, ५ गंभीर

ट्रेलर एसटीच्या धडकेत २ ठार, ५ गंभीर

अलिबाग : अलिबाग - पेण राज्यमार्गावर शहाबाज पेट्रोलपंपजवळ अलिबागकडून पनवेलला जाणार्‍या एसटी बसने समोरुन येणार्‍या ट्रेलरला दुपारी जोरदार धडक दिली. या अपघातात एसटीतील प्रवासी सुनंदा वसंत पाटील (६०,रा. कमळपाडा, शहाबाज) व संजय तुकाराम गावंड (४६, रा. सुतारपाडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल अपघातातील पाच जखमींमध्ये सुनील गजानन राऊत (४२, नवेदरबेली), अमरनाथ सिताराम पाटील (४०, शहाबाज), रमेश सखाराम शिगवण (४४, जांभूळपाडा), भाग्यश्री गणेश अत्रे (४२, पनवेल) आणि रामूबाई मयू पाटील (७५,डोलवी, पनवेल) यांचा समावेश आहे.
-----

फोटो - 13अलिबाग ॲक्सिडन्ट
फोटोओळ- अपघात झालेली धडक इतकी जोरात होती की त्यात एसटीच्या पूढील भागचा चूराडा झाला तर ट्रकट्रेलरचे तूटून दोन भाग झाले (छाया- सूनील बुरुमकर)

Web Title: Two killed, 5 seriously injured in Trailer ST