अकोल्यात दोन चिमुकल्यांचे अपहरण
By Admin | Updated: September 11, 2016 19:33 IST2016-09-11T19:33:02+5:302016-09-11T19:33:02+5:30
गोर्धा वेसनजीक राहणाऱ्या दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना १० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.यामुळे या भागात खळबळ उडाली आहे

अकोल्यात दोन चिमुकल्यांचे अपहरण
ऑनलाइन लोकमत
अकोला - हिवरखेड शहरातील गोर्धा वेसनजीक राहणाऱ्या दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना १० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वैभव गजानन भागळकर (वय ८) व विजय सुनील पवार (वय ७) हे दोघे जि. प. प्राथमिक मुलांची शाळा इयत्ता दुसरी व तिसरीमध्ये शिकतात. दरम्यान, घरून बाहेर खेळावयास गेले होते. ते सायंकाळपर्यंत घरी न आल्यामुळे पालकांनी त्यांच्या नातेवाइकांसह शोध घेतला. ते कुठेही आढळून न आल्याने आज ११ सप्टेंबर रविवारी पालक व शालू गजानन भागडकर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
वैभव या मुलासह विजय पवार हे दोघे चिमुकले मुले अज्ञात इसमाने पळवून नेले. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे करीत आहेत. आकोट शहरातून यापूर्वी मनश्री लकडेचे अपहरण झाले होते. या परिसरात चिमुकल्या मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याचे घटनेवरून दिसून येत आहे. परिसरात पालकांनी या टोळीची धास्ती घेतली आहे.