शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयात जन्मले दोन डोक्यांचे बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 08:32 IST

सोलापुरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत.

- विलास जळकोटकरसोलापूर - सोलापुरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. या रुग्णालयात अशी प्रसूती पहिल्यांदाच झाली असल्याच्या वृत्ताला अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दुजोरा दिला. सोलापुरातील विडी घरकूल परिसरातील एका दाम्पत्य प्रसुतीसाठी येथील छत्रपती सर्वोपचार शासकीय रुग्णालयात बुधवारी दाखल केले होते. वैद्यकीय नियमांप्रमाणे संबंधित मातेची प्रसूतीपूर्व सोनोग्रॉफी करण्यात आली. यावेळी सयामी (जुळे) बाळ असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली. आज (गुरुवारी) सकाळी या मातेचे सिझर केले असता प्रसूतीनंतर दोन डोके असलेले बाळ जन्मले. वैद्यकीय परिभाषेत याला ‘कोजाईन्ड टिष्ट्वन’ म्हटले जाते. जन्माला आलेल्या बाळाला दोन हृदय, दोन श्वसननलिका, दोन हात, दोन पाय, एक लिव्हर आणि दोन किडनी असून शरीर मात्र एकच आहे. या बालकाला रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या बाळाला आॅक्सिजन, सलाईन व अन्य औषधे सुरु आहेत. या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा बाळांना फुफ्फूस, ह्दयाचे इतर आर असून शकतात. असा प्रकारे जन्मणारे बाळ लाखात एक असू, शकते. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळावर बालरोग विभाग प्रमूख डॉ. शाकिरा सावस्कर, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन चक्रे उपचार करीत आहेत, या बाळाच्या आजाराची कल्पना त्याच्या पालकांना अगोदरच होती. प्रसूतीपूर्व तपासणीमध्ये याचे निदान झाले होेते. रुग्णालयात स्त्रीरोग विभागप्रमूख डॉ. विद्या तिरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिझर करण्यात आले. हॉस्पिलटलचे तज्ज्ञ डॉक्टरांसह डॉ. जय धडके, डॉ. श्रवण  बाळाच्या उपचारावर लक्ष ठेऊन असून, त्याच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. विचित्र सयामी प्रसूती दुर्मिळ घटना दोन डोकी असणारे अशा प्रकारची प्रसूती होण्याचे प्रकार लाखातून एक असे आढळते. अशा घटना जगभरात घडलेल्या आहेत. मात्र सोलापुरात माझ्या पस्तीसएक वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलीच घटना आहे. अन्यत्र खासगी रुग्णालयात हा प्रकार दुर्मिळ असावा. गर्भधारणेतील दोषामुळे अशी गुंतागुंतीचे अपत्य जन्माला येऊ शकते असे मत अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी सांगितले. वैद्यकीय पथक कार्यरतसध्या बाळ नवजात अतिदक्षता विभागात उपचाराला प्रतिसाद देत आहेत. मात्र त्याला फुफ्फूस, हृदयासह श्वसनलिका, अन्ननलिका याचे त्रास असू शकतात. त्या दृष्टीने वैद्यकीय पथक २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या दुर्मिळ बाळाची वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचा भाग पाहणी केली. सर्वोतोपरी प्रयत्न सुरु अशाप्रकारे जन्मलेल्या बाळांच्या शरीराची रचना गुंतागुंतीची असू शकते. त्या दृष्टीने वैद्यकीय पथक सर्वोतोपरी काळजी घेत आहे. रुग्ण कोणताही असो त्याला वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. आम्ही त्या दृष्टीने दक्ष आहोत, असे बालरोग विभागाच्या प्रमूख  डॉ. शाकिरा सावस्कर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूरnewsबातम्याNatureनिसर्गJara hatkeजरा हटकेMaharashtraमहाराष्ट्र