गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात दोन गावठी पिस्टल जप्त

By Admin | Updated: January 14, 2015 23:18 IST2015-01-14T23:00:09+5:302015-01-14T23:18:53+5:30

गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल

Two folk pistols seized in Gulistan firing case | गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात दोन गावठी पिस्टल जप्त

गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात दोन गावठी पिस्टल जप्त

अमरावती : गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
बाबाद्दीन वल्द बद्रोद्दीन (४४,रा.कमेला ग्राऊंड), कलंदररोद्दीन वल्द बद्रोद्दीन (३५,रा.जमील कॉलनी), अहेफाज अहेमद ऐजाज अहेमद (३५,रा. जाकिर कॉलनी), शेख वसीम उर्फ चायना वल्द शेख मकसूद (२६, रा. हैदरपुरा), अफरोज खान, मोहम्मद इरफान ऊर्फ अंग्रेज वल्द मोहम्मद युसुफ, अजहर खान ऊर्फ चायना झुरावर खान यांना अटक करण्यात आली होती. या सातही आरोपींना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपींच्या कबुलीतून बुधवारी पोलिसांनी दोन आरोपींकडून दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. आरीफ लेंड्यावर उपचार नागपूर येथील रुग्णालयात सुरु आहे

Web Title: Two folk pistols seized in Gulistan firing case