दोन दिवसाचे बालक चोरीला! मध्यरात्रीच्या सुमारास बुरखाधारी महिलेने पळवले बाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:51 IST2017-09-27T12:28:51+5:302017-09-27T12:51:57+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसाचे मुल पळविले.

Two-day child stolen! A baby girl was arrested by a burqa woman at around midnight | दोन दिवसाचे बालक चोरीला! मध्यरात्रीच्या सुमारास बुरखाधारी महिलेने पळवले बाळ 

दोन दिवसाचे बालक चोरीला! मध्यरात्रीच्या सुमारास बुरखाधारी महिलेने पळवले बाळ 

ठळक मुद्देसुमय्या बी नामक महिलेने दोन दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला.

खामगाव - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसाचे मुल पळविले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सुमय्या बी नामक महिलेने दोन दिवसापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं ५ मध्ये भरती ठेवण्यात आले होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला व तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कार मधून रुग्णालयात दाखल झाले व दोन दिवसाच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला. 
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे  घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे हे रात्री ३:३० वा रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two-day child stolen! A baby girl was arrested by a burqa woman at around midnight