शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी

By admin | Updated: August 16, 2014 02:19 IST

पालिका क्षेत्रात एलबीटी ठेवायची अथवा नाही, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातही जकात सुरू करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत

ठाणे : पालिका क्षेत्रात एलबीटी ठेवायची अथवा नाही, याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातही जकात सुरू करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. असे असतानाही ठाणे महापालिकेने मात्र याधीच एलबीटी विभागासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागारांवर दोन कोटींची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागाला प्राप्त झालेल्या विवरण पत्रांची छाननी करण्याचा पुरेसा अनुभव एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांना नसल्याने त्रिस्तरीय सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेने यापूर्वी अनेकदा विविध प्रकारच्या प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागारांपोटी कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचे अनेदा समोर आले आहे. परंतु यातील अनेक प्रकल्प हे कागदावरच राहिलेले आहेत. त्यात पालिकेची आर्थिक परिस्थिती एलबीटीमुळेच एकीकडे ढेपाळलेली असताना सल्लागारांवर कोट्यवधी खर्च करण्याचा पालिकेचा अट्टाहास अद्यापही थांबलेला नाही. एलबीटी ठेवायचे की जकात ठेवायचे, यासंदर्भातील निर्णय राज्यातील त्या त्या महापालिकांनी घ्यावा, असे राज्य शासनाने नुकतेच स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचा हा निर्णय येण्याधीच ठाणे महापालिकेने सल्लागार नेमण्याची लगबग सुरू केली आहे. पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी एकीकडे उपसमिती नेमण्यात आली असून अनेक विभागांना उत्पन्नवाढीसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी एप्रिलमध्ये जकातऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा अनुभव नसताना देखील त्यांनी या विभागाचे काम योग्य पद्धतीने हाताळले आहे. पालिकेचे उत्पन्न घसरण्यासाठी ज्या एलबीटी विभागाला कारणीभूत धरण्यात आले होते़ त्याच विभागाची वसुली इतर विभागांच्या तुलनेत समाधानकारक आहे. मात्र असे असताना कर्मचाऱ्यांना पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे करून सल्लागार नेमण्यासाठी आता २ कोटींची उधळपट्टी पालिका करणार आहे. (प्रतिनिधी)