शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 12:13 IST

या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे तशा चर्चा सुरू झाल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी मध्यरात्री ही भेट घेतल्याने ते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. त्यात या दोघा आमदारांवर संशयाची सुई होती. ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे तशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीपासून संशयकल्लोळ

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा खोसकर अजित पवार गटाबरोबर जाणार असल्याची चर्चा होती. महायुतीत इगतपुरीची जागा शिंदे सेनेला जाण्याची शक्यता असल्यान खोसकर यांनी शिंदे सेनेकडून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

अंतापूरकर यांचा देगलूर मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे होता. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाला अंतापूरकर गैरहजर होते. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांच्यावर काँग्रेसजणांचा अविश्वास होता. आता अंतापूरकर अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे ते  शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्र्यांसोबत मतदारसंघातील निधीबाबत चर्चा झाली आहे. त्यासाठीच ती भेट होती;  मी कुणालाही भेटलो तर माझ्याविषयी वावड्या उठविल्या जात आहेत. मी काँग्रेस पक्षातच असून, यापुढेही पक्षातच राहणार आहे, शिवाय उमेदवारीदेखील मलाच मिळणार आहे.  - हिरामण खोसकर, आमदार

देगलूर मतदारसंघात हजारो शेतकऱ्यांना २०२३ मधील नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नाहीत. ते देण्यात यावेत, तसेच शासनाने जाहीर केलेले ५ हजार रुपयांचे अनुदान तुटपुंजे असून, कापूस आणि सोयाबीनचे हेक्टरी अनुदान वाढवून द्यावेत, असे प्रश्न मी मुख्यमंत्र्यांकडे मांडले.  - जितेश अंतापूरकर, आमदार

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMLAआमदार