शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

रेवस-रेड्डी मार्गावरील चार पुलांच्या उभारणीसाठी दोन कंपन्या, लवकर निविदा अंतिम केल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 08:02 IST

Revas-Reddy road: कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील चार खाड्यांच्या कामासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्ट्रक्शन कंपनीचा समावेश असून, लवकर या निविदा अंतिम केल्या जाणार आहेत.

 मुंबई -  कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील चार खाड्यांच्या कामासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्ट्रक्शन कंपनीचा समावेश असून, लवकर या निविदा अंतिम केल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कुंडलिका, काळबादेवी, जयगड आणि कुणकेश्वर येथे पुलांच्या उभारणीसाठी निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात निविदा मागविल्या होत्या. त्याच्या तांत्रिक निविदा मे महिन्यात खुल्या करण्यात आल्या होत्या. या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद देत नऊ निविदा भरल्या होत्या.

एमएसआरडीसीकडून नुकत्याच त्याच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अशोक बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री या कंपन्यांना प्रत्येकी दोन खाड्यांच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. त्यामध्ये विजय एम मिस्त्री कंपनीने कुणकेश्वर आणि कळबादेवी खाडीवरील पुलाच्या कामासाठी लघुतम निविदा दाखल करून बाजी मारली आहे, तर अशोका बिल्डकॉन कंपनीने जयगड आणि कुंडलिका खाडीवरील पुलाच्या कामासाठी लघुतम निविदा दाखल केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता या निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. रेवस ते सिंदुधुर्गमधील रेड्डी दरम्यान ४४७ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग उभारला जात आहे. त्याचाच भाग म्हणून या मार्गावर खाडी भागात ८ ठिकाणी नवीन खाडी पुलांचे आणि २ उड्डाणपुलांचे काम प्रस्तावित आहेत. 

या पुलांचे होणार काम      कुंडलिका खाडीवर रेवदांडा ते साळव खाडी पूल - ३.८ किमी (पोचमार्गासह)      जयगड खाडीवरील तवसळ ते जयगड खाडी पूल - ४.४ किमी (पोचमार्गासह)      काळबादेवी येथील पूल - १.८५ किमी (पोचमार्गासह)      कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम - १.५८ किमी (पोचमार्गासह)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणhighwayमहामार्ग