दोन भोंदू ‘अंनिस’च्या जाळ्यात

By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी आखाडा येथे दोन भोंदू बाबांना लोकांची फसवणूक करताना पकडले़ यापुढे फसवणूक करणार नाही, अशी हमी

Two bhondu 'snake' in the net | दोन भोंदू ‘अंनिस’च्या जाळ्यात

दोन भोंदू ‘अंनिस’च्या जाळ्यात

राहुरी (अहमदनगर) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी आखाडा येथे दोन भोंदू बाबांना लोकांची फसवणूक करताना पकडले़ यापुढे फसवणूक करणार नाही, अशी हमी स्टॅम्पपेपरवर लिहून दिल्यावर या भोंदू बाबांची सुटका झाली़
भीमा गंगाराम बाबर व नारायण सिद्धू चव्हाण (दोघेही रा़ अंबड, जि. जालना) हे जोगेश्वरी आखाडा परिसरात भविष्य सांगून पैसे वसूल करीत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजले़ ‘तुम्हाला भस्म करू, आम्हाला चमत्कार येतो,’ अशी धमकी या दोघांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिली़
कार्यकर्त्यांनी या बुवांची उलटतपासणी सुरू केली असता, ‘आम्हाला काहीही चमत्कार येत नाही’, असे म्हणत ‘माफ करा, पुन्हा असे करणार नाही’, अशी विनवणी या बुवांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Two bhondu 'snake' in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.