शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन राष्ट्रवादींचे दोन वर्धापन दिन; मनोमिलनाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:02 IST

NCP Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचेही मेळावे दणक्यात पार पडले. पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दोन्ही मेळाव्याचे आकर्षण मात्र दोन्ही गटांच्या मनोमिलनाच्या प्रश्नाभोवतीच फिरत राहिल्याचे पाहायला मिळाले.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचेही मेळावे दणक्यात पार पडले. पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दोन्ही मेळाव्याचे आकर्षण मात्र दोन्ही गटांच्या मनोमिलनाच्या प्रश्नाभोवतीच फिरत राहिल्याचे पाहायला मिळाले.

कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची इच्छा नेमकी काय आहे, हे दादा पक्के जाणून आहेत त्यामुळे त्यांनी ही गुगली टाकल्याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. तर तिकडे खा. सुप्रिया सुळे यांनी ‘जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल, एकत्रीकरण भावा-बहिणीचा खेळ नाही’ असे सांगून टाकले. 

‘विचारांत अंतर पडले’ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाषणात पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांपैकी कोणाचेही थेट नाव घेणे टाळले. ते म्हणाले, मूलभूत विचारांमध्ये अंतर पडले म्हणून फूट पडली आहे; पण चिंता करू नका, विचारांबरोबर राहा, जनतेशी बांधीलकी ठेवा, सत्ता आपोआप येईल. पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली आहेत. सर्वसामान्यांमधूनही राज्यकर्ते तयार करता येतात, हे पक्षाने दाखवून दिल्याचेही शरद पवार म्हणाले.  

भुजबळ, भरणे, वळसे पाटील गैरहजरअजित पवार गटाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे नेते गैरहजर होते. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.परंतु, भुजबळ आणि भरणे हे पूर्वनियोजित विदेश दौऱ्यावर आहेत, तर वळसे-पाटील यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते आले नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

‘याला कोणतीही कालमर्यादा नाही’येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्ष एक परिवार आहे, असेही अजित पवार म्हणाले.अजित पवार व माझे जन्मापासूनचे नाते आहे. कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत, राजकीय निर्णय करायचा तर मात्र सर्वांना विचारूनच करावा लागेल. कारण शरद पवार यांनी आमच्यावर तसेच संस्कार केले आहेत. कधी एकत्र येणार किंवा नाही याला कोणतीही कालमर्यादा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार