तुकोबारायांचे गुरुवारी तर माऊलींचे शुक्रवारी प्रस्थान
By Admin | Updated: June 19, 2014 03:15 IST2014-06-19T03:15:15+5:302014-06-19T03:15:15+5:30
आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी, तर कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २० जूनला

तुकोबारायांचे गुरुवारी तर माऊलींचे शुक्रवारी प्रस्थान
अकलूज (ता. माळशिरस) : आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी, तर कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २० जूनला श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अश्वांचे अकलूजहून श्री क्षेत्र देहूकडे
बुधवारी प्रस्थान झाले असून, अंकोलीशितोळे येथून निघालेले श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दोन अश्व गुरुवारी आळंदीत दाखल होणार आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून, पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. २० जून रोजी आकुर्डी, २१ जून व २२ जून पुणे, २३ लोणी काळभोर, २४ ला यवत, २५ रोजी वरवंड, २६ रोजी उंडवडी गवळ्यांची, २७ रोजी बारामती, २८ रोजी सणसर, २९ रोजी अंथुर्णे, ३० रोजी निमगाव केतकी, १ जुलै व २ जुलै रोजी इंदापूर, ३ रोजी सराटी, ४ रोजी अकलूज, ५ रोजी बोरगाव, ६ रोजी पिराची कुरोली, ७ रोजी वाखरी येथील मुक्कामानंतर सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे.
पालखी सोहळ्यात बेलवडी येथे मेंढरांचे गोल रिंगण होणार असून, इंदापूर व अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर, बाजीराव विहीर व पादुका विसावा मंदिर येथे अश्वांचे उभे रिंगण होणार आहे. या पालखी सोहळ्यात स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दोन अश्व सहभागी
होत असून या अश्वांचे बुधवारी सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान झाले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून, पहिला मुक्काम गांधी वाड्यात असणार आहे. २१ व २२ रोजी पुणे, २३ व २४ रोजी सासवड, २५ रोजी जेजुरी, २६ जूनला वाल्हे, २७ व २८ रोजी लोणंद, २९ रोजी तरडगाव,३० व १ जुलै रोजी फलटण, २ जुलै रोजी बरड, ३ जुलै रोजी नातेपुते, ४ जुलै रोजी माळशिरस, ५ जुलै रोजी वेळापूर, ६ जुलै रोजी भंडीशेगाव, सोमवार ७ जुलै रोजी वाखरी मुक्कामानंतर ८ जुलै रोजी
पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)