शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंची 'देवबंदी'; नाशिक पालिकेतील देवी-देवतांचे फोटो हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 12:53 IST

पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत.

नाशिक: आपल्या बेधडक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच संबंधितांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे. नुकताच त्यांनी एका सरकारी निर्णयाचा आधार घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देवी-देवतांचे फोटो लावून कामकाज करण्यावर बंदी घातली आहे. मुंढे यांच्या अल्टिमेटमनुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटीचे दोन दिवस कार्यालयात येऊन महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली. पालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचेच फोटो राहणार आहेत.या आदेशानंतर आयुक्तांच्या स्वीय सचिवांच्या कक्षात असलेली दत्ताची तसबिर काढण्यात आली तर अन्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील तसबिरी हटविल्या. मुंढे यांनी देवबंदी करत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले असले तरी श्रद्धेला हात घालून ‘पारदर्शक’ कारभार होईल काय, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मुंढे यांनी अधिका-यांनी कार्यालयात येताना जीन्स पँट, टी-शर्ट घालून येऊ नये, फॉर्मल ड्रेसमध्येच यावे, पायात स्पोर्ट शूज नकोत, असे आदेशही दिल्याचे समजते. त्यामुळे, अधिकारी वर्ग धास्तावला असून ड्रेस-शूज आणि प्रशासकीय कामकाजाची घालण्यात आलेली सांगड चर्चेचा विषय बनली आहे. राजीव गांधी भवनमधील प्रवेशद्वारावर लागणा-या दुचाकीही हटविण्याचे निर्देश मुंढे यांनी दिल्याचे समजते. याशिवाय, त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना परस्पर प्रसारमाध्यमांशी बोलण्यावरही बंदी घातली आहे. यावरून मुंढे यांनी प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावरच राहण्याची केलेली ही योजकता मुंढे यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashikनाशिक