शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Tukaram Mundhe: सरकारची प्रतिमा मलिन करण्याची तुकाराम मुंढेंची प्रवृत्ती; तानाजी सावंत यांनी लिहिलेले शिंदेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 10:23 IST

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात तानाजी सावंत यांनी केले होते आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई  : राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अचानक बदली होण्यामागे खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे.

समज देऊनही मुंढे यांच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. उलटपक्षी आरोग्य विभागाची व पर्यायाने सरकारची प्रतिमा मलिन करण्याची त्यांची वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी केली होती.

तानाजी सावंत यांनी पत्रात काय म्हटले? nआरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुंढे धमकावतात आणि त्यांना मंत्री कार्यालयात संपर्क न ठेवण्याच्या तोंडी सूचना देतात.nआशा वर्कर्स व परिचर यांच्या शिष्टमंडळासमोर हुज्जतबाजी करून स्फोटक वक्तव्ये माझ्यासमोरच करून त्यांनी आंदोलकांच्या भावना दुखावल्या होत्या.nराष्ट्रीय आरोग्य मिशन ठाणे येथे कार्यरत कार्यकारी अभियंता सोनवणे यांना मुंढे यांनी अचानक कामावरून काढले. तत्काळ निर्णय घेऊ नका; मी मुंबईत आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेऊ असे मी त्यांना म्हटले. तरीही त्यांनी सोनवणेंना काढले, पदाची जाहिरात प्रसिद्धीला दिली व मंत्री म्हणून माझ्या निर्देशांचा अपमान केला.nमी त्यांना अनेकदा मोबाइल कॉल करतो, पण ते प्रतिसाद देत नसत, नंतर कॉलबॅक करण्याची तसदीही ते घेत नाहीत.nमुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

मुंढे यांचे ते ट्विट : आयुष्याची वाटचाल तुमच्या अपेक्षेनुनसार नेहमीच होत नसते... असे ट्विट तुकाराम मुंढे यांनी ४ डिसेंबरला म्हणजे त्यांच्या बदलीनंतर पाचव्या दिवशी केले. या ट्विटद्वारे त्यांनी बदलीमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त केल्याचे म्हटले जाते. भ्रष्टाचार खपवून न घेणारे अधिकारी अशी मुंढे यांची  प्रतिमा राहिली आहे. आरोग्य मंत्री सावंत यांना न जुमानता त्यांनी विभागातील अपप्रवृत्तींना रोखण्याचे  प्रयत्न केले व त्यातूनच त्यांचे खटके उडाल्याचे म्हटले जाते.

तुकाराम मुंढेंची तक्रार करणाऱ्या पत्रावर मुख्यमंत्री शिंदे यांनी खुलासा मागविला. मुंढे यांनी खुलाशाचे पत्र दिले, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची बदली करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

या संपूर्ण घटनाक्रमाबाबत प्रतिक्रिया विचारली असता तुकाराम मुंढे यांनी बोलण्यास नकार दिला. ही कार्यालयीन बाब आहे; मी बोलणे योग्य नाही, एवढेच ते म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेTanaji Sawantतानाजी सावंत