तटकरे बिनविरोध!
By Admin | Updated: August 15, 2014 03:07 IST2014-08-15T03:07:03+5:302014-08-15T03:07:03+5:30
विधान परिषद पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने गुरुवारी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बिनविरोध निवडून आले.

तटकरे बिनविरोध!
मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने गुरुवारी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बिनविरोध निवडून आले.
पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ‘श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी माघार घेत आहे. मी नाराज नाही, पण दु:खी आहे. काँग्रेसने निवडणूक लढविली असती तर नक्कीच जिंकली असती, अशी भावना जोशी यांनी बोलून दाखविली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बुधवारी रात्री झालेली बैठक, त्यानंतर चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेअंती जोशी यांनी माघार घेण्याचे ठरले. गुरुवारी ठाकरेंनी दिल्लीत श्रेष्ठींशी संपर्क साधला व जोशी यांच्या माघारीवर श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. (विशेष प्रतिनिधी)