अकोला : या वर्षीच्या खरीप हंगामात वर्हाडातील पाच जिल्ह्यातील १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून,त्या दृष्टीने बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या विविध संस्था व शेतकर्यांकडील मिळून १३ लाख ३७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामुळे शेतकर्यांनी काळ्याबाजारातून सोयाबीन खरेदी करण्याचे टाळावे.अकोला जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे. त्याकरिता १ लाख ५० हजार क्िंवटल बियाणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत १ लाख ८० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये शेतकर्यांकडील ५१ हजार क्विंटल, महाबीज ११ हजार, खासगी कंपन्यांकडून ६७ हजार, एपीएमसी, वखार महामंडळ व बुलडाण अर्बन यांच्याकडील ५१ हजार क्िंवटल बियाण्यांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या सर्व संस्था व शेतकर्यांकडील मिळून जवळपास ४ लाख ३ हजार क्िंवटल बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. या जिल्ह्याला २.७० लाख क्िंवटल बियाणे अपेक्षित आहे. वाशिम जिल्ात २ लाख ७५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाणार असल्याचा अंदाज आहे. या जिल्ाला एकूण २.०६ लाख क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. प्रत्यक्षात सर्व संस्था व शेतकर्यांकडील बियाणे बघितल्यास ते २ लाख ७१ हजार क्विंटल उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी २.८० लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात २ लाख १४ हजार क्िंवटल बियाणे उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ात ३ लाख ९२ हजार हेेक्टरवर सोयाबीन लागवड केली जाणार आहे. या क्षेत्रासाठी २.९४ लाख क्विंटल बियाण्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात २ लाख ६९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३३ हजार क्िंवटल बियाणे शिल्लक आहे. अकोला जिल्ात ३० हजार, वाशिम जिल्ह्यात ६५ हजार क्िंवटल बियाणे शिल्लक आहे. तर अमरावती ६६ व यवतमाळ जिल्ह्याला मात्र २५ हजार क्िंवटल बियाणे कमी पडणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भरू न काढण्याचा प्रयत्न! अमरावती विभागात साडेतेरा लाख बियाणे उपलब्ध
By admin | Updated: June 7, 2014 23:55 IST