नवीन हरित क्रांतीसाठी प्रयत्न हवेत
By Admin | Updated: August 18, 2014 00:34 IST2014-08-18T00:34:27+5:302014-08-18T00:34:27+5:30
‘नीरी’चे (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) माजी संचालक प्रा.पी. खन्ना यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांची दृष्टी केवळ पर्यावरण, विज्ञान

नवीन हरित क्रांतीसाठी प्रयत्न हवेत
के.पी.न्याती : ‘नीरी’त खन्ना व्याख्यानमाला
नागपूर : ‘नीरी’चे (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) माजी संचालक प्रा.पी. खन्ना यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांची दृष्टी केवळ पर्यावरण, विज्ञान आणि अभियांत्रिकी यापुरतीच मर्यादित नव्हती, तर पर्यावरणाच्या आर्थिक परिणामांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. जर देशाला उच्च आर्थिक दर प्राप्त करायचा असेल तर, पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता नवीन हरित क्रांती राबविण्यासाठी योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ के.पी.न्याती यांनी व्यक्त केले.
‘नीरी’ व ‘सीएसआयआर’ (कौन्सिल आॅफ सायंटिफीक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नीरी’चे माजी संचालक प्रा.पी.खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा.खन्ना व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
‘नीरी’चे कार्य हे नेहमीच समाज आणि देशहिताचे राहिले आहे. प्रा.पी.खन्ना यांच्या माध्यमातून ‘नीरी’ला दूरदृष्टी असलेले प्रशासक लाभले होते. १९८० च्या दशकात सूक्ष्मजीवांच्या मदतीने पर्यावरणात सुधार आणण्यासाठी प्रा. खन्ना यांनी पर्यावरण संस्थेला एक नवी दिशा देण्याचे महनीय कार्य केले आहे, असे न्याती म्हणाले.(प्रतिनिधी)