शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते व एकच राहणार आहेत..

ठळक मुद्देवढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केली टीका

कोरेगाव भीमा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवरायांचे गुरू हे स्वामी रामदास हे होऊच शकत नसल्याचे विधान केले होते. त्या विधानाचा संदर्भ घेत भाष्य करताना शिवरायांचे खरे गुरू हे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब याच आहेत, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. संभाजीराजे म्हणाले की, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याच्या वंशजासंदर्भात पुरावे मागितले. भोसले यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल काय पुरावे द्यायचे? आमचे छत्रपतींचे घराणे आहे. तोंडात येईल ते काही बोलून चालत नाही. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. वढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संभाजी महाराज बोलत होते.  ते म्हणाले, की नरेंद्र मोदींची तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकाचा महाराष्ट्रात सर्वांत आधी निषेध केलेला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण मलीन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा राज्यात पुस्तकावर चर्चा सोडून दुसरीकडेच चर्चा गेली आहे. महाराष्ट्र वेगळे राज्य असून इतर राज्यांना आदर्श देण्याची आवश्यकता आहे.    ...........................प्रत्येक पक्षात अतिउत्साही लोक आहेत. पवारसाहेबांनी कधीच त्यांना जाणता राजा म्हणा, असे सांगितले नाही. तसेच, मोदी साहेब व बाळासाहेबपण कधी बोलले नाही. पण, अतिउत्साही लोक असतात त्याला कोण समर्थन करतय असही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते व एकच राहणार आहेत. भविष्यातही त्यांना कोणीच आवाहन देऊ शकणार नाही. म्हणून यात पवार, मोदी किंवा बाळासाहेबांची चूक नसून प्रत्येक पक्षात कलाकार लोक असतात त्यांची आहे.  त्यांना प्रत्येक पक्षाने आवर घालायचा असतो. शिवरायांच्या गुरूंबाबत त्यांनी राजमाता जिजाऊ याच त्यांच्या गुरू असल्याची इतिहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंबद्दल जे आवाहन दिले जाते, पुरावे मागितले ही घटना महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. - नितेश राणे, आमदार

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीhistoryइतिहासNitesh Raneनीतेश राणे