ट्रकची बांधकाम सेंट्रींग घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला धडक, तीन मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:34 IST2017-10-14T12:33:19+5:302017-10-14T12:34:20+5:30
भरधाव ट्रकने बांधकाम सेंट्रींग घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले.

ट्रकची बांधकाम सेंट्रींग घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला धडक, तीन मजूर ठार
यवतमाळ - भरधाव ट्रकने बांधकाम सेंट्रींग घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले. ही घटना राळेगाव ते मेटीखेडा मार्गावरील मजरा (ता.कळंब) गावाजवळ शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की ऑटोरिक्षाचा चुराडा करून ट्रक वीज खांब तोडून रस्त्याच्या कडेला गेला.
गजानन पंधरे (२२), विनोद भोयर (३०), कमलदास किनाके (२२) सर्व रा.सावंगी(पेरका) ता.राळेगाव अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही बांधकामासाठी लागणारे लाकडी सेंट्रींग घेऊन ऑटोरिक्षाने जात होते.
त्यावेळी मजरा गावाजवळ समोरून येणा-या भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिली. ऑटोरिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात हे तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळावर पोहोचले होते.