तृप्ती देसाईंची 'ताईगिरी' आता मोठ्या पडद्यावर
By Admin | Updated: October 6, 2016 10:13 IST2016-10-06T10:08:18+5:302016-10-06T10:13:45+5:30
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच येण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांनी स्वतः सोशल मीडिया फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे.

तृप्ती देसाईंची 'ताईगिरी' आता मोठ्या पडद्यावर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.6 - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच येण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांनी स्वतः सोशल मीडिया फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे. 'ताईगिरी' असे या सिनेमाचे नाव असून, आज पुण्यामध्ये सिनेमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सिनेमामध्ये तृप्ती देसाई यांची भूमिका कोण साकारणार?, याबाबतची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
आणखी बातम्या
'सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आणि दिग्दर्शक दीपक बलराज वीज आमच्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी आमचे अभिनंदन केले, आणि आमचे आंदोलन आणि माझ्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच बनवणार असल्याची घोषणा केली', असे पोस्ट देसाई यांनी फेसबुकवर केले आहे. आमच्या संघर्षाला मोठे स्थान दिल्याबाबत धन्यवाद, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी किशोरी शहाणे आणि बलराज यांचे आभार मानले आहेत.