दोन युवकांवर अस्वलाचा हल्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 19, 2016 22:58 IST2016-08-19T22:58:58+5:302016-08-19T22:58:58+5:30
मोहरद येथील दोन तरूणांवर अस्वलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वरगव्हाण रस्त्यावर घडली.मात्र तरूणांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे ते बचावले.

दोन युवकांवर अस्वलाचा हल्याचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
धानोरा, दि. १९ : मोहरद येथील दोन तरूणांवर अस्वलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वरगव्हाण रस्त्यावर घडली.मात्र तरूणांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे ते बचावले.
मोहरद येथील फकीरा सायबू तडवी व बिस्मिल्ला दगा तडवी हे दोघ तरूण १८ रोजी रात्री ९ वाजता मोटारसायकलने वरगव्हाण येथे नातलगाकडे कामानिमित्त जात होते. त्यांना सोनवाय नाल्यावर अस्वल उभे असलेले दिसले. दोघ तरूणांनी त्यास पळविले. तरूण मार्गस्थ होत असतांना अस्वल त्यांच्या मोटारसायकलच्या मागे धावत सुटले. उडी मारून अस्वलाने हल्याचा प्रयत्नही केला. परंतु त्यांनी समयसूचकता दाखवित गाडीचा वेग वाढविल्यामुळे दोघ तरूण हल्यातून थोडक्यात बचावले.