शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आदिवासी विकास योजना हातभर, प्रत्यक्षात लाभार्थी मात्र वीतभर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 1:07 PM

आदिवासींच्या उद्धारासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. प्रत्यक्षात अनेक योजना मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत.

ठळक मुद्देविकास योजना तळापर्यंत पोहोचतच नाहीत; योजनांची प्रसिद्धी कागदावरच

नारायण जाधवठाणे : आदिवासींच्या उद्धारासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. प्रत्यक्षात अनेक योजना मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे योजना हातभर आणि लाभार्थी वीतभर, असे म्हणण्याची वेळ राज्याच्या १३ जिल्ह्यांतील आदिवासींवर आली आहे़अधिकाधिक आदिवासींपर्यंत या योजना पोहोचाव्यात म्हणून सामान्य प्रशासन विभागाने मे २०१३ मध्ये प्रसिद्धीची मात्रा शोधली. त्यानुसार माहिती व जनसंपर्क विभागास मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती आखून देण्यात आली.याअंतर्गत योजनांच्या प्रसिद्धीसाठी होर्डिंग्ज, बॅनर्स, घडीपत्रिका, जाहिरात, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, केबलवरून जिंगल्स प्रसारण, भित्तीपत्रकांसह प्रदर्शन, मेळावे आणि कलापथकांच्या माध्यमातून आदिवासींसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धी करण्याचे बंधन माहिती आणि जनसंपर्क खात्यास घालण्यात आले होते.

शासनाने हा आदेश देऊन आज सहा वर्षे उलटली, तरी आदिवासींच्या विकासासह उत्थानासाठीच्या योजनांची अपवाद वगळता प्रसिद्धी झालेलीच नाही.‘लोकमत’ टीमने पालघरपासून मेळघाटपर्यंत आणि नंदुरबारपासून गडचिरोलीपर्यंत आदिवासी भागांत केलेल्या पाहणी दौºयात एकाही शहरात वा गावात आदिवासी विकास योजनांचे ना होर्डिंग्ज दिसले, ना भित्तीपत्रक़.....आंध्र प्रदेश-तेलंगणा आघाडीवरकुपोषण निर्मूलनासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी वारेमाप प्रसिद्धी केली. शिवाय युनिसेफसारख्या संस्था आणि आशा स्वयंसेविकांसह अंगणवाडी सेविकांमार्फत त्या घराघरात पोहोचविल्या............न्यूट्रियन मिशनअंतर्गत ‘आपली अम्मा अमृत हस्तम योजना’ गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांपर्यंत पोहोचविली आहे. २०२६ पर्यंत राज्य कुपोषणमुक्त करण्याचा त्यांचा ध्यास अहे. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बालहक्क क्षेत्रात कार्यरत विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची समितीही गठित केली होती....किती निधी खर्च ९. ३२ कोटी रुपये राज्य शासनाने २०१७-१८मध्ये आदिवासींपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी खर्च केले आहेत. ८ कोटी रु. २०१८-२०१९मध्ये खर्चिले..१० कोटींची तरतूद आता २०१९-२०मध्ये करण्यात आली आहे.

* ११ टक्के  आदिवासींची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येत आहे. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

शासनाचे असेच धोरण असेल तर कुपोषण निर्मूलन होणार कसे? योजनांची माहितीच जर दुर्गम भागातील आदिवासी पाड्यात पोहोचणार नसेल तर या योजना काय कामाच्या?        - प्रकाश निकम, सभापती, पंचायत समिती मोखाडा, जि. पालघर...........सरकारने आदिवासी विकास योजनांच्या माहितीचे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स गावागावातील आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, बालविकास केंद्रांच्या परिसरात लावायला हवे. तसेच आदिवासींत शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने योजनांची माहिती ग्रामसभांसह गावागावांत पथनाट्यांद्वारे द्यायला हवी. - बाळाराम भोईर, सरचिटणीस, श्रमजीव..........आदिवासी काय म्हणतात..?

रोजगार हमी योजना अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजे काय रे भाऊ? - शांताराम साबळे, अंबामोळी, मुरबाड, जि. ठाणे...........कुपोषण निर्मूलनासह आदिवासी विकासाच्या एकाही योजनेची माहिती आमच्या गावासह परिसरात शासनाकडून देण्यात आलेली नाही.- नामदेव गिरा, चिल्लारवाडी, शहापूर, जि. ठाणे...........रोजगार हमीची कामे कागदावरच असून, इतर योजनांची माहिती नसल्याने स्थलांतराशिवाय पर्याय नाही. - पांडुरंग भाऊ मालक, खोच जव्हार, जि. पालघर................ 

टॅग्स :thaneठाणेPoshan Parikramaपोषण परिक्रमाGovernmentसरकार