शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी टेंडर मुख्यमंत्र्यांनी केले रद्द; काँग्रेसच्या नाराजीचे मूळ याच पुरवठ्याबाबत असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:52 IST

आदिवासींना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात मदत दिली जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

- यदु जोशीमुंबई : साडेअकरा लाख आदिवासी कुटुंबांना कोरोनाच्या काळात मदत म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये रोख देताना दोन हजार रुपयांच्या खाद्यवस्तू पुरविण्यासाठीचे २९१ कोटी रुपयांची वादग्रस्त कंत्राट प्रक्रिया राज्य शासनाने शुक्रवारी रद्द केल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आदिवासींना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात मदत दिली जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून डीबीटीद्वारेच आदिवासींना मदत करावी, अशी शिफारस केली असली, तरी आदिवासी विकास विभागाने निविदा प्रक्रिया सुरूच ठेवली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात दिले होते. त्याचे पडसाद मंत्रालयात उमटले. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, एकूण चार हजार रुपयांपैकी दोन हजार रुपये रोखीने आणि दोन हजार रुपये खाद्यवस्तू स्वरूपातच द्यावेत, असा आग्रह आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांनी कायम ठेवला असून, खाद्यवस्तू पुरविणे हे आदिवासींच्या हिताचे असल्याची भूमिका घेतली आहे. पूर्ण रक्कम डीबीटी करण्याच्या विरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी जे पत्र लिहिले त्यात, दलित, आदिवासींसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा आणि तो त्याच आर्थिक वर्षात खर्च व्हावा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आदिवासींना खाद्यवस्तू पुरवठ्याची कंत्राट प्रक्रिया रद्द करण्यावरून असलेली नाराजी या मुद्द्याच्या मागे असल्याचे म्हटले जाते.  आदिवासींच्या बँक खात्यात चार हजार रुपये टाकणे, अथवा तूर्त फक्त दोन हजार रुपयेच डीबीटीद्वारे देणे अशा दोनच पर्यायांवर राज्य सरकार विचार करीत आहे. आता काँग्रेसच्या नाराजीनंतर राज्य सरकार ही भूमिका कायम ठेवणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस