मुलींच्या जन्मदरात आदिवासी आघाडीवर
By Admin | Updated: July 31, 2016 04:08 IST2016-07-31T04:08:49+5:302016-07-31T04:08:49+5:30
संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगात कन्येलाच प्रथम मान दिला आहे

मुलींच्या जन्मदरात आदिवासी आघाडीवर
कुळी कन्या, पुत्र होती जे सात्त्विक तयाचा हरेक वाटे देवा...
रमेश पाटील,
जळगाव- संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगात कन्येलाच प्रथम मान दिला आहे... नंतर पुत्राचा उल्लेख आहे... असाच सन्मान जळगाव जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात मिळाला आहे. रावेर तालुुक्यात एक हजार मुलांमागे तब्बल १५०० मुली जन्माला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुुले व मुलींच्या जन्मदरातील आकडेवारीत प्रचंड तफावत होती. यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता शासनस्तरातून जनजागृतीसह अनेक प्रयत्न
झाले. पाल (ता. रावेर) येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल परिसरात मार्च या महिन्यात प्रमाणात १५०० मुलींचा जन्म झाला आहे.
>अशी आहे आकडेवारी...
रावेर तालुक्यात एकूण तीन ग्रामीण रुग्णालये व सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामधील मार्च २०१६ची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. (आकडेवारी प्रती हजार मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आहे.)
पाल ग्रामीण रुग्णालय -१५००, खिरोदा- १०७१, वाघोड- १०००, रावेर ग्रामीण रुग्णालय ९०९, सावदा ग्रामीण रुग्णालय- ८५९ व प्राथमिक आरोग्य केंद्र - ऐनपूर ८५७, चिनावल ९१०, निंभोरा ८०२, थोरगव्हाण ७८९, लोहारा ७७४ असा मुुलींचा जन्मदर असल्याची माहिती रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
>रावेर तालुक्यातील बराचसा भाग हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे या समाजाला सोनोग्राफी आदी चाचण्यांची माहिती नाही. त्यामुळे कन्याजन्माचे प्रमाण वाढले आहे. हे म्हणजे सुशिक्षित समजल्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात अंजनच आहे.
-डॉ. विजया झोपे,
वैद्यकीय अधिकारी, रावेर तालुका