Tree planting in Maharashtra is a bit tricky; Actor Sayaji Shinde makes serious allegations against the government | महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप   
महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप   

मुंबई - महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 5 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला त्यावर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत? 33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. 

तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. 

या वृक्ष लागवडीबाबत सयाजी शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनखात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. 
1) शासनाच्या नर्सरीमध्ये सगळ्या जाती का उपलब्ध नाहीत 
2) शासन दुसऱ्या राज्याचा आदर्श का घेत नाही. उदा. कर्नाटकातील नर्सरी अनेक जाती उपलब्ध होतात. 
3) सगळे अधिकारी आहे त्यांच्याकडून माहिती घ्या
4) लोकांकडून पैसे घेऊन वृक्ष लागवड होत असेल तर त्या सर्व करदात्यांचा पैशाचा हिसोब द्यावा 

भ्रष्टाचाराच्या, खोटेपणाच्या मागे लागून माझं आयुष्य जाईल अशी खंतही सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. 
 


Web Title: Tree planting in Maharashtra is a bit tricky; Actor Sayaji Shinde makes serious allegations against the government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.