शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:01 IST

५१४३ जणांचा मृत्यू : ३५,७१७ अपघातांपैकी साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे

मुंबई : राज्यात दुचाकींची संख्या जास्त असून दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. २०१८ मध्ये घडलेल्या एकूण ३५,७१७ अपघातांपैकी दुचाकीचे सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात झाले, त्यामध्ये १३,२६१ जणांना जीवास मुकावे लागले. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे झाले, तर सर्वात कमी ई-रिक्षाचे दोनच अपघात घडले असून, यात एकाचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या २०१८च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी दुचाकीचे एकूण १३,७३२ अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला असून, ७,२७८ जण गंभीर जखमी, तर ३,८२५ जण किरकोळ जखमी झाले. घडलेल्या एकूण अपघातांमध्ये दुचाकीनंतर कार, जीप, व्हॅन, टॅक्सी या चारचाकी वाहनांचा नंबर लागतो. या वाहनांचे एकूण ७,५९१ अपघात घडले. यात २,४५० जणांना जीवास मुकावे लागले. ४,९०२ गंभीर जखमी झाले, तर २,४६८ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत ट्रक, लॉरीचे ३,९२५ अपघात होऊन १,७१९ जणांचा मृत्यू झाला. बसचे १,६८९ अपघात होऊन ६२३ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहने, ट्रॉलीचे १,३७८ अपघात घडले. यात ६३६ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ गंभीर जखमी आणि ३२० किरकोळ जखमी झाले.ई-रिक्षा सुरक्षितमहामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ई-रिक्षाचे केवळ दोनच अपघात घडले असून यात एकाचा मृत्यू झाला. तर, सायकलचे ४१३ अपघात होऊन यात १२५ ठार, २२६ गंभीर, तसेच १४२ किरकोळ जखमी झाले. इतर १,९६५ अपघातांमध्ये ९१४ जणांना जीव गमवावा लागला असून, यात ९८६ गंभीर, तर ४५८ किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर