पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरु

By Admin | Updated: June 20, 2016 13:45 IST2016-06-20T11:43:23+5:302016-06-20T13:45:12+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. दादर येथे झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, चारही मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.

Transport on the Western Railway route started | पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरु

पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक सुरु

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० -पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे.  दादर येथे झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, चारही मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. दादर येथे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. 
 
मुंबईच्या दिशेने येणा-या लोकल बांद्रा रेल्वे स्थानकात थांबल्या होत्या. चर्चगेट रेल्वे स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नव्हती. माहीममधल्या बाटर बॉक्सची चोरी झाल्यामुळे हा बिघाड झाला होता. १५ मिनिटात बिघाड दुरुस्त करु असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला होता.
 
ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड उदभवल्याने कामावर जाणा-या लाखो नोकरदार प्रवाशांचे हाल झाले. लोकलमध्ये लाईट आणि पंखे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या हालामध्ये आणखी भर पडली. अनेक रेल्वे प्रवासी स्वत:च गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन चालत गेले. दादरसह अन्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.   आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर लोकल दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत होत्या. 
 
 
 
 

Web Title: Transport on the Western Railway route started