शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पारदर्शक प्लॅस्टिक वापराला १५ आॅगस्टपर्यंत मुभा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:22 IST

पारदर्शक प्लॅस्टिकच्या ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांना १५ आॅगस्टपर्यंत कारवाईपासून सूट मिळण्याची शक्यता आहे.

- चेतन ननावरे मुंबई : पारदर्शक प्लॅस्टिकच्या ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांना १५ आॅगस्टपर्यंत कारवाईपासून सूट मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री प्लॅस्टिक उत्पादक, सामाजिक संस्था, ट्रेडर्स यांच्या शासनाच्या तज्ज्ञ समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या निर्णयाला मंजुरी दिली, तर दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.उत्पादन ठिकाणी होणाऱ्या पॅकिंगच्या पिशव्यांना बंदीतून आधीच शासनाने सूट दिली आहे. शर्ट, साडी व इतर कपडे तयार होणाºया ठिकाणीच त्यांना पारदर्शक प्लॅस्टिकमध्ये पॅक केले जाते. म्हणून कापड व्यापाºयांना बंदी आदेश लागू होत नसल्याचे शासनाने स्पष्ट केल्याचे फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी सांगितले.>दुकानदारांना दिलासा देण्याची तयारीराज्यातील साडेतेरा लाख दुकानदारांकडून प्लॅस्टिक पिशव्यांसाठी असलेल्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. मुळात राज्यातील किराणा दुकानदार हे डाळींपासून खाद्यतेल, सुका मेवा अशा विविध वस्तू नॉन वुवन बॅगमधून देतात.महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया करणे शक्यआहे. मात्र, सुट्ट्या पद्धतीने नॉन वुवन बॅगेतून या वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याने दुकानदार बंदीच्या कचाट्यात सापडणार आहेत. या युक्तिवादावर तज्ज्ञ समितीनेही दुकानदारांना दिलासा देण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र, १५ आॅगस्टपर्यंत नॉन वुवन बॅगवर त्यासंबंधी शिक्के मारणे बंधनकारक आहे. या बॅग ६० जीएसएमच्या असून, ५० मायक्रॉन ते २५० मायक्रॉनपर्यंतच्या पिशव्यांनाच या निर्णयात दिलासा मिळणार असल्याचे समजते.>किलोला १०० रुपयांचा दरकिराणा दुकानांत डाळ, तेल, साखर आणि असे विविध पदार्थ देण्यात येणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रद्दीमध्ये प्रतिकिलोमागे १०० रुपयांचा दर मिळतो. त्यामुळे कचरा वेचक मोठ्या प्रमाणात या पिशव्यांचा कचरा उचलतात. डम्पिंग ग्राऊंडवरही याच पिशव्यांचे वर्गीकरण करून ते भंगारात विकले जाते. त्यामुळे या पिशव्यांवरील बंदी उठवण्याच्या मागणीवर फेरविचार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी