पश्चिम विदर्भातील ७० महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या, ३४ उपजिल्हाधिकारी, ३६ तहसीलदारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 04:47 PM2019-02-21T16:47:29+5:302019-02-21T16:47:52+5:30

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निर्देश जारी केलेत. ‘त्या’ चार मुद्यांवर विभागातील ७० महसूल अधिका-यांच्या बदल्या शासनाने बुधवारी उशिरा केल्या

Transfers of 70 revenue officers in West Vidarbha | पश्चिम विदर्भातील ७० महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या, ३४ उपजिल्हाधिकारी, ३६ तहसीलदारांचा समावेश

पश्चिम विदर्भातील ७० महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या, ३४ उपजिल्हाधिकारी, ३६ तहसीलदारांचा समावेश

Next

अमरावती : सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निर्देश जारी केलेत. ‘त्या’ चार मुद्यांवर विभागातील ७० महसूल अधिका-यांच्या बदल्या शासनाने बुधवारी उशिरा केल्यात. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गातील ३४ अधिकारी आणि ३६ तहसीलदारांचा समावेश आहे.
बदली झालेल्या अधिका-यांमध्ये (कंसात बदलीचे ठिकाण) - अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे एसडीओ मनोहर कडू (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अमरावती), अचलपूरचे एसडीओ व्यंकट राठोड (एसडीओ, पुसद), तिवसाचे एसडीओ विनोद शिरभाते (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, अमरावती), अमरावतीचे एसडीओ इब्राहिम चौधरी (एसडीओ, दारव्हा), पुसदचे एसडीओ नितीनकुमार हिंगोले (एसडीओ, मोर्शी), राळेगावचे एसडीओ संदीप असार (एसडीओ, अचलपूर), जळगाव-जामोदच्या एसडीओ स्रेहा उबाळे (एसडीओ, राळेगाव), यवतमाळचे उपजिल्हाधिकारी रमेश पवार ( एसडीओ, बाळापूर), यवतमाळचे आरडीसी नरेंद्र फुलझेले (एसडीओ, तिवसा), बुलडाण्याचे आरडीसी ललितकुमार वºहाडे (आरडीसी, यवतमाळ), मेहकरचे एसडीओ राजेश पारनार्ईक (आरडीसी, बुलडाणा), दारव्हाचे एसडीओ जयंत देशपांडे (एसडीओ, मेहकर), अकोटचे एसडीओ उदयसिंह राजपूत (एसडीओ, अमरावती), अमरावती उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी (एसडीओ, अकोट), अकोलाचे उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध खंडागळे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिमचे आदेश रद्द), अमरावतीचे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन ( उपजिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम), एसडीओ वणी प्रकाश राऊत ( एसडीओ, वाशिम), कारंजाचे एसडीओ शरद जावळे (एसडीओ, वणी), यवतमाळचे उपजिल्हाधिकारी अनूप खांडे (एसडीओ, कारंजा), अमरावतीचे उपजिल्हाधिकारी राम लठाड (आरडीसी, अकोला), अकोला उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर (उपजिल्हाधिकारी, यवतमाळ), बुलडाणा उपजिल्हाधिकारी रमेश काळे (उपजिल्हाधिकारी, वाशिम) व नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले राजेश्वर हांडे (उपजिल्हाधिकारी, बुलडाणा) यांचा समावेश आहे. 

बदलीप्राप्त ३६ तहसीलदारांमध्ये (कंसात पूर्वीचे-बदलीचे ठिकाण) पुरुषोत्तम भुसारी (अंजनगाव सुर्जी-बाळापूर), डी.पी. पुंडे (बाळापूर-मारेगाव), विजय साळवे (मारेगाव-वाशीम), डी.आर. बाजड (देऊळगाव राजा-पातूर), सुरेश कव्हळे (लोणार-मालेगाव), गणेश माळी (बुलडाणा-मोर्शी), अनिरुद्ध बक्षी (मोर्शी-राळेगाव), एच.एफ. गांगुर्डे (राळेगाव-वरूड), प्रदीप पवार (चिखलदरा-मूर्तिजापूर), आर.एम. तायडे (मूर्तिजापूर-नांदुरा), आर.पी. खंडारे (नांदुरा-उमरखेड), अजितकुमार येळे (भातकुली-चिखली), आर.जी. पुरी (पातूर-पुसद), उमेश खोडके (खरेदी अधिकारी, अमरावती-चांदूर बाजार), बी.पी. कांबळे (उमरखेड-धारणी), एम.एम. जोरवर (केळापूर-नांदगाव खंडेश्वर), किशोर पारखे (धारणी-धामणगाव संगायो), मनीष गायकवाड (चिखली-चिखलदरा), आशिष बिजवल (वरूड-संगायो अकोला), राजेश वझीरे (मालेगाव-दिग्रस), बी.डी. अरखराव (वाशिम-भातकुली), एम.जे. शिंदे (नझूल अकोला-अमरावती जि.का.), व्ही.व्ही. घुगे (अकोट-अंजनगाव सुर्जी), सैफन नदाफ (एडीएसओ वाशिम-लोणार), संजय गरकल (पुसद-मेहकर), पूजा माटोडे (खरेदी अधिकारी अकोला-घाटंजी), गजेंद्र मालठाणे (अमरावती-खरेदी अधिकारी यवतमाळ), आर.ए. काळे (बार्शीटाकळी-एडीएसओ यवतमाळ), मनोज लोणारकर (नांदगाव खंडेश्वर-नझूल अकोला), जी.के. हामंद (घाटंजी-बार्शीटाकळी) सुनील शेळके (संगायो बुलडाणा-केळापूर), किशोर बागडे (दिग्रस-अकोला), आर.पी. वानखेडे (अधीक्षक वाशीम-एडीएसओ अकोला), पुष्पा सोळंके-दाभेराव (एफएसओ अमरावती-बुलडाणा महसूल), निकिता जावरकर (अमरावती महसूल-अमरावती), संतोष काकडे (मेहकर-अमरावती) यांचा समावेश आहे.

Web Title: Transfers of 70 revenue officers in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.