राज्यातील १७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

By Admin | Updated: January 14, 2015 04:07 IST2015-01-14T04:07:51+5:302015-01-14T04:07:51+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल हाती घेतले असून, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाऊक कार्यक्रम सध्या राबविला जात आहे.

Transfers of 17 convicted officers in the state | राज्यातील १७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

राज्यातील १७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल हाती घेतले असून, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाऊक कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. मंगळवारी देबाशिष चक्रवर्ती, आभा शुक्ला यांच्यासह १७ सनदी अधिका-याच्या राज्य सरकारने बदल्या केल्या. चक्रवर्ती यांची नियुक्ती शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली तर आभा शुक्ला यांची नियुक्ती नवी दिल्लीत निवासी आयुक्तपदी करण्यात आली आहे.
चक्रवर्ती यांची दोन दिवसापूर्वी शिक्षण विभागात बदली करण्यात आली होती. मात्र ते रुजू होण्यास राजी नसल्याने त्यांच्याकडे पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले. तर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी भिडे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.
राज्य शासनाने केलेल्या अन्य बदल्या अशा: आशिष शर्मा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाय. इ. केरुरे मत्स्योत्पादन आयुक्त, सचिन कुरवे मनरेगा नागपूरचे आयुक्त, ओम प्रकाश बकोरिया क्रीडा व युवक आयुक्त पुणे, उदय चौधरी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल रेखावार गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती दीपा मुधोळ बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजीत चौधरी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. देवेंद्र सिंग अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय मीना वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आस्तिक कुमार पांड्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. जी. अर्दाड हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. बी. उन्हाळे सीड कॉर्पोरेशन अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक, पी. शिवा शंकर कोल्हापूर महापालिका आयुक्त, सुशील खोडवेकर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Transfers of 17 convicted officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.