शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या, शिक्षकांची सरकारकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:49 IST

एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई - एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षक दाम्पत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहून विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षण महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाल्याने वर्षांनुवर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्या शिक्षक पती-पत्नींनी राज्य सरकारला एक निवेदन देऊन आमची एकाच ठिकाणी बदली करा किंवा या दिवाळीला घटस्फोटासाठी सरकारकडे अर्ज देऊ, असा इशारा दिला आहे.  महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे. राज्यात शिक्षक पती-पत्नीची जिह्ल्यांतर्गत बदली ही 30 किलोमीटरच्या आत करण्यात यावी असा नियम आहे. मात्र काही शिक्षक दाम्पत्यांच्या बदलीच्या ठिकाणांचे अंतर हे शेकडो किलोमीटर आहे. राज्यामध्ये अशी अनेक शिक्षक दाम्पत्ये आहेत जी गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत. इतकी वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केल्यानंतरही एकाच ठिकाणी बदली होत नसल्याने हे शिक्षक आता एवढे संतप्त झालेआहेत की त्यांनी सरकारकडे आपल्याल घटस्फोट देण्याची मागणी केली आहे.   

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार