अमरावती परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 09:12 PM2020-10-30T21:12:48+5:302020-10-30T21:13:42+5:30

Police Officer Transfer : सर्वाधिक यवतमाळातील :  पाच पीआय, १८ एपीआय, ४० फौजदारांचा समावेश

Transfer of 63 police officers in Amravati constituency | अमरावती परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमरावती परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देअमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नरेश पारवे वाशिम, यवतमाळचे संजय डहाके व मुकुंद कुळकर्णी अनुक्रमे अमरावती ग्रामीण व अकोला, वाशिमचे श्रीराम घुगे व बुलडाणाचे महेंद्र देशमुख यांना अकोला जिल्हा पोलीस दलात पाठविण्यात आले आहे.

यवतमाळ : अमरावतीचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी शुक्रवारी सायंकाळी परिक्षेत्रातील ६३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामध्ये पाच निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक व ४० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 


अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नरेश पारवे वाशिम, यवतमाळचे संजय डहाके व मुकुंद कुळकर्णी अनुक्रमे अमरावती ग्रामीण व अकोला, वाशिमचे श्रीराम घुगे व बुलडाणाचे महेंद्र देशमुख यांना अकोला जिल्हा पोलीस दलात पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये अमरावती ग्रामीणचे सतीश आडे, मुकुंद कवाडे व अभिजित अहीरराव अनुक्रमे बुलडाणा, अकोल्याचे सुनील सोळुंके, राजू भारसाकडे, गणेश वनारे अनुक्रमे बुलडाणा व यवतमाळ जिल्हा, बुलडाण्याचे विक्रांत पाटील, संग्रामसिंह पाटील, जनार्दन शेवाळे, मालती कायटे अनुक्रमे अमरावती ग्रामीण, अकोला जिल्ह्यात पाठविण्यात आले. यवतमाळ येथील प्रमोद पाचकवडे, मनोज लांडगे, अनिल राऊत, अलका गायकवाड, प्रशांत गिते, विनोद झळके यांना अनुक्रमे बुलडाणा, अकोला, अमरावती ग्रामीण, वाशिम, अमरावती ग्रामीण, वाशिम येथे नियुक्ती देण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील एपीआय समाधान वाठोरे व विनोद घुईकर यांना अमरावती ग्रामीण व अकोला जिल्ह्यात नेमणूक देण्यात आली आहे. 


फौजदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावती ग्रामीणचे तीन, अकोला जिल्ह्यातील १२, बुलडाणा जिल्ह्यातील १२, यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तर वाशिम जिल्ह्यातील चार फौजदारांचा समावेश आहे.

Web Title: Transfer of 63 police officers in Amravati constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.