चार डबे सोडून रेल्वेगाडी वेगाने पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 01:15 IST2017-04-12T01:15:22+5:302017-04-12T01:15:22+5:30

नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेगाडी ४ डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली.

Trains leaving the four coaches fast forward! | चार डबे सोडून रेल्वेगाडी वेगाने पुढे!

चार डबे सोडून रेल्वेगाडी वेगाने पुढे!

मनमाड (नाशिक) : नांदेड येथून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेगाडी ४ डबे मागे सोडून वेगाने पुढे निघून गेल्याची घटना मंगळवारी घडली. हा प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर तुटलेले डबे जोडण्यात आले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. या घटनेमुळे गाडीला सुमारे अर्धातास विलंब झाला.
नांदेड येथून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेसने मंगळवारी सायंकाळी मनमाड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर रेल्वेच्या बंधाऱ्याजवळ गाडी थांबल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने पाहणी केली
असता गाडीचे मागचे चार डबे थांबलेले दिसले. उर्वरित डबे घेऊन गाडी पुढे निघून गेल्याचे समजताच त्यांनी चालकाला याची माहिती दिली. चालकाने तातडीने
गाडी थांबवून मागे आणली
आणि डब्बे जोडून गाडी पुन्हा नेण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Trains leaving the four coaches fast forward!