शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिस दीक्षांत समारंभात चंदगडची लेक महाराष्ट्रात नंबर एक, अष्टपैलू कामगिरी करत मिळविले मानाचे पाच पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:31 IST

वडिलांचे छत्र हरपले, आईचे पाठबळ मिळाले, रोज सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण पूर्ण केले

निंगाप्पा बोकडेचंदगड : वडिलांचे छत्र हरपले म्हणून खचली नाही. आईचे पाठबळ मिळाले. त्या जोरावर रोज सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण पूर्ण केलेल्या जकनहट्टी येथील प्रियांका श्यामला शांताराम पाटील हिने नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधिनीत १२६ व्या दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांमध्ये अष्टपैलू कामगिरी केली. तिने मानाचा 'रिव्हाॅल्व्हर ऑफ ऑनर' हा पुरस्कार मिळविल्याने चंदगडची ही लेक महाराष्ट्रात नंबर एक ठरली आहे.जकनहट्टी येथील प्रियांका पाटील हिने सुरुवातीपासून हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत गावात चौथीपर्यंतचे तर रोज सहा किलोमीटरची पायपीट करून पुढील शिक्षण कोवाडमध्ये पूर्ण केले. दरम्यानच्या काळात तिच्या वडिलांचे निधन झाले. पण मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तिची आई पाठीशी खंबीर उभी राहिली. त्यामुळे प्रियांकाने मागे वळून न बघता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. सध्या तिचे प्रशिक्षण नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधिनीत सुरू असताना दीक्षांत समारंभात तिने अष्टपैलू कामगिरी करत मानाचे पाच पुरस्कार मिळविले. त्यामुळे परिस्थितीचे भांडवल करणाऱ्यांसाठी प्रियांकाची कामगिरी प्रेरणादायी ठरली असून, तिचे तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रियांकाला मिळालेले पुरस्कारसर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणजेच रिव्हाॅल्व्हर ऑफ ऑनर, बेस्ट ट्रेनी, सर्वोत्कृष्ट कायदा, सर्वोत्कृष्ट अभ्यास व सर्वोत्कृष्ट कवायत असे एकूण पाच पुरस्कार प्रियांका हिला मिळाले आहेत.

तालुक्यातील तीनजण चमकलेसर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पाटील हिच्यासोबतच तालुक्यातील बागिलगे येथील तुषार पाटील याला तामिळनाडूमध्ये ओव्हर ऑल बेस्ट ट्रेनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोवाडच्या वैशाली खन्नूरकर हिने प्रशिक्षणादरम्यान चमकदार कामगिरी केल्याने चंदगड तालुक्याचे नाव राज्यभर पोहचले आहे.यशात आईचा मोठा वाटापरिस्थितीने मला खूप काही शिकवलं असून, आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. आई-वडिलांसह प्रबोधिनीतील मार्गदर्शकांचा माझ्या यशात मोलाचा वाटा असल्याचे पाटील हिने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandgad's Priyanka Patil shines, tops Maharashtra police training, wins awards.

Web Summary : Overcoming adversity, Priyanka Patil from Chandgad excelled in police training. She secured five awards, including the prestigious 'Revolver of Honour', ranking first in Maharashtra. Her success, fueled by her mother's support, inspires many.