शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मांजराच्या खवल्यांची तस्करी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

टोळी जेरबंद : बोलेरो गाडीसह ४० किलो ३०० ग्रॅम खवले जप्त; सर्व संशयित बेळगाव, कारवार परिसरातील

चिपळूण : नवीन बोलेरो गाडीतून खवल्या मांजरांच्या खवलांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कुंभार्ली घाटातील तपासणी नाका येथे गुरुवारी रात्री १०.४५ वाजता बोलेरो गाडी पाच आरोपींसह जप्त केली. दुर्धर त्वचा रोगावरील औषधे, बुलेटप्रुफ जाकीटासह देवदेवस्कीसाठी या खवल्यांचा वापर होत असल्याने ते महाग आहेत आणि त्यामुळेच त्याची तस्करी केली जाते.ओवळी परिसरात न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या हवालदार राजेंद्र देसाई व प्रकाश शिंदे यांना खवले मांजराची खवले (पँगोलिन) एका बोलेरो गाडीतून (केए २२ झेड ७८६१) कऱ्हाडच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती मिळाली. हवालदार देसाई यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना तत्काळ ही माहिती दिली. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, चालक प्रभाकर साळवी, वैभव जाधव, रमाकांत शिंदे, डी. के. जाधव, एस. टी. पवार, पी. बी. शिंदे यांनी सापळा रचला. सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोपी घाटाकडे आले नाहीत. मात्र, तरीही पोलिसांनी आपली ‘फिल्डिंग’ कायम ठेवली. रात्री १०.४५ च्या सुमारास बोलेरो गाडी घाटामध्ये आली. नवीनच दिसणारी ही गाडी पोलिसांनी तपासणीकरिता थांबविली. गाडीमध्ये सीटखाली वेगवेगळे कप्पे करून त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत खवले (पँगोलिन) असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी गाडीतील पाचही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. जप्त केलेली गाडी आणि खवले यांची किंमत सुमारे २७ लाख २४ हजार ३०० रुपये होते. याप्रकरणी सागर दत्तात्रय कदम (वय २७, रा. वडगाव, बेळगाव), रिझवान बाबासाहेब सय्यद (३२, रा. वडगाव, बेळगाव), प्रमोद दत्तात्रय कदम (३२, रा. वडगाव, बेळगाव), (पान ७वर)खवल्यांचा वापर नेमका कशासाठी?खवल्या मांजराचे खवले (पँगोलिन) हे दुर्धर त्वचा रोगावरील औषधे बनविण्यासाठी, बुलेटप्रुफ जाकीट बनविण्यासाठी तसेच देवदेवस्की, जादूटोण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, ५१ अन्वये याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी वन खात्याचे सहकार्य घेतले जात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.खवल्यांना परदेशातही मागणीखवल्या मांजर हा प्राणी वाघासारखा अतिशय महत्त्वाचा व दुर्मीळ प्राण्यांच्या घटकात गणला जातो. अनुसूची क्र.१ मध्ये त्याचा समावेश असतो. त्याच्या खवल्योचा औषधांसाठी वापर केला जात असल्याने त्याची खवले अव्वाच्या सव्वा दराने बाजारात विकली जातात. परदेशात त्याला चांगली मागणी असते, असे प्रभारी परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील यांनी सांगितले.