मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग

By Admin | Updated: July 12, 2016 21:13 IST2016-07-12T21:06:07+5:302016-07-12T21:13:37+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील कसा-याला जाणा-या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

In the traffic disruption of the Central Railway, the pentagram of the local people going to Kasara | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील कसा-याला जाणा-या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सीएसटीहून कसा-याला जात असताना सव्वा आठच्या सुमारास लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. ही घटना कोपर स्थानकावरील फलाट क्र ३ वर घडली. दरम्यान, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या गतीच्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तसेच, या आगीमुळे कोणातही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते.

Web Title: In the traffic disruption of the Central Railway, the pentagram of the local people going to Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.