मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाड

By Admin | Updated: June 6, 2017 17:34 IST2017-06-06T17:34:52+5:302017-06-06T17:34:52+5:30

मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झाली आहे.

Traffic disruption in the Central Railway, failure of the signal system | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाड

>ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 06 -  मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झाली आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कार्यालयातून घरी परतणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच, मध्य रेल्वेच्या ठिकठिकाच्या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होताना दिसत आहे. याचबरोबर ठाण्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. तसेच, धीम्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
 
दरम्यान, रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Traffic disruption in the Central Railway, failure of the signal system